काल एका मोठ्या दिमाखदार उद्घाटन सोहळ्याने टोकियो ऑलिंपिकची सुरवात झाली आणि सुरवात झाली ती पदकांच्या लयलूटीला.!
मागील काही ऑलिंपिकचा इतिहास जर पहिला तर आपल्या लक्षात येईल की या स्पर्धेवर सातत्याने अमेरिका व चीनचं वर्चस्व राहिलेलं आहे!
रशिया, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, कोरिया यांचाही डंका आपल्याला ऑलिंपिकमध्ये पाहायला मिळतोच; पण पदकांची जी लयलूट होते ती मात्र अमेरिका आणि चीन कडूनच! दोन्ही देशांत पदकांसाठी अक्षरशः रस्सीखेच पाहायला मिळते.
कालच्या उद्घाटनाच्या सोहळ्यानंतर जेव्हा खेळांना खरी सुरवात झाली तेव्हा पहिली उत्सुकता लागून राहिली आणि ती म्हणजे पहिलं सुवर्ण मिळवण्यात कोण बाजी मारणार? अपेक्षेप्रमाणे चीनने त्यात बाजी मारली!
चीनी नेमबाज कियान यांग हिने टोकियो ऑलिंपिकची पहिली सुवर्णपदक विजेती होण्याचा मान मिळवला! आसाका शूटिंग रेंज वरती झालेल्या १० मीटर एयर रायफल प्रकारात तिने २५१.८ अशा नवीन ऑलिंपिक रेकॉर्डसहीत पहिलं सुवर्णपदक पटकावलं. तिने रशियाच्या अॅनास्तासिया गालाशिना हिला अवघ्या ०.७ गुणांच्या फरकाने मागे टाकत सुवर्ण पदकावर कब्जा केला! अॅनास्तासिया
तिच्या सोबत रशियाच्या अॅनास्तासिया गालाशिना हिने २५१.१ गुणांसह रौप्य पदक मिळवले तर स्वित्झर्लंडच्या निना क्रिस्टीनने २३०.६ गुणांसह कास्य पदक पटकावले.

आपल्याला आपल्या भारतीय खेळाडूंकडूनही खूप अपेक्षा आहेत. आपल्याही खेळाडूंनी भरपूर मेहनत घेतली असून या तरी ऑलिंपिकला आपल्या पदकांचा दुष्काळ संपतो की नाही ते पाहणं महत्वाचं ठरेल!
टोकियो ऑलिंपिकच्या उद्घाटन सोहळ्याबद्दलही वाचा.
[…] […]
[…] […]