Prime Minister Narendra Modi launched Digital Payment eRupi.
आज २ ऑगस्ट रोजी भारताचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते e-Rupi या एका digital payment प्रणालीचं भारतामध्ये अनावरण करण्यात आलं.

ऑनलाइन कॉन्फरन्स घेऊन हा कार्यक्रम पार पाडण्यात आला. Digital Currency क्षेत्रामध्ये eRupi च्या माध्यमातून भारतातर्फेहे एक महत्वाचं पाऊल म्हणावं लागेल.
काय आहे e rupi ?
eRupi ई रूपी ही एक डिजिटल पेमेंट्स (digital payments) वर आधारित एक (electronic voucher) इलेक्ट्रोनिक व्हाऊचर प्रणाली आहे.
हे काम कसं करेल?
ही एक कॅशलेस व कॉनटॅक्टलेस डिजिटल पेमेंट प्रणाली किंवा माध्यम असून याचे व्हाऊचर थेट लाभार्थ्याच्या मोबाईलवर एसएमएस ने किंवा QR कोडने पाठवलं जाईल. हे साधारणपणे एखाद्या गिफ्ट व्हाऊचर सारखं असेल आणि ते रिडिम करण्यासाठी आपल्याला आपलं डेबिट वा क्रेडिट कार्ड पण लागणार नाही. किंवा आपल्याला कोणत्याही अॅपची पण गरज भासणार नाही. फक्त ज्या सुविधा केंद्रांवर ते रिडिम केलं जाऊ शकतं अशा ठिकाणी जाऊन आपल्याला ते रिडिम करावं लागेल.
यामध्ये आपल्याला कुणा मध्यस्थाची गरजही पडणार नाही, थेट पुरवठादार ते लाभार्थी अशी याची देवाणघेवाण राहील आणि हीच याची जमेची बाजू वाटत आहे. पैशाच्या मधल्या गळतीला याने आळा बसला जाऊ शकतो असा शासनाला ठाम विश्वास आहे.
e-Rupi विकसित कुणी केलं?
नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI),आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, वित्तीय सेवा विभाग आणि राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण यांनी हे eRupi विकसित केले आहे. ही व्यक्ती-विशिष्ट आणि उद्देश-विशिष्ट पेमेंट सिस्टम असेल व ते मुख्यतः एनपीसीआई च्या यूपीआई प्लॅटफॉर्म वर विकसित केलेले आहे.
इतर बातम्या:
तुम्ही Ola Scooter बुक केली का?
Pegasus बद्दल तुम्हाला माहीत आहे का?
याचा वापर कसा केला जाईल?
याचा वापर काही शासकीय सुविधांचे विशेषतः कल्याणकारी योजनांचे लाभ शासनाला थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी वापरली जाणार आहे. जसे की माता व बालकल्याण योजना, क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम,आयुषमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, खत अनुदानांतर्गत योजना तसेच अशा योजना ज्यांमार्फत लोकांना औषधे उपलब्ध करून दिली जातात. अशा बऱ्याच गोष्टींत याचा वापर केला जाऊ शकतो.
शिवाय खाजगी क्षेत्रातील कंपन्याही याचा वापर आपल्या कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी वा बाकी कारणांसाठी करू शकतात.
जोपर्यंत हे व्हाऊचर आपल्या मोबाईल मध्ये असेल तोपर्यंत ते आपलं असेल आणि त्याला एक ठराविक एक्सपायरी तारीख सुद्धा असेल म्हणजे त्या तारखेपर्यंत आपल्याला ते रिडिम करावं लागेल नाहीतर त्यानंतर त्याची किंमत शून्य ठरवली जाईल किंवा ते बाद ठरवलं जाईल.
आज २ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ४ वाजून ३० मिनिटांनी पंतप्रधानांनी ह्या सेवेचं ऑनलाईन उद्घाटन केले. मध्यस्थाची साखळी नष्ट करणे, कॅशलेस व कॉनटॅक्टलेस डिजिटल पेमेंट व पैशाच्या गळतीला आळा या महत्वाच्या बाबींवर त्यांनी लक्ष वेधले.
[…] […]
[…] […]
[…] पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गोल्डमॅन नीरज चोप्राला शुभेच्छा […]