e peek pahani ई पीक पाहणी
शेअर करा.

महाराष्ट्र शासनाने नुकतंच त्यासाठी एक मोबाइल ॲप देखील आणलं आहे.

राज्यातील पीक नोंदीसाठी आणि पीक विमे सुरळीत मिळण्याच्या हेतूने आणि बकही काही हेतूने हे ॲप आणले आहे.

मागील महिन्यात एक पत्रक जारी करून सरकारने खरीप विम्याची माहिती भरण्याची मुदत ३० सप्टेंबर केली होती.

e pik pahani ई पीक पाहणी
e peek pahani ई पीक पाहणी

नव्या पत्रकात त्यांनी ही मुदत वाढवत म्हटले आहे की राज्याच्या काही भागात पूर, अतिवृष्टी, कोरोना, उशिरा मॉन्सून आणि ई पीक पाहणी e peek pahani app ॲप वरून शेतकऱ्यांनी भरायच्या ई पीक महितीबाबत राज्यस्तरीय अंमलबजावणी समितीच्या दिनांक ३० सप्टेंबर २०२१ च्या बैठकीत ई पीक पाहणीच्या शेतकरी स्तरावरील कामाची काळमर्यादा ३० सप्टेंबर वरून दिनांक १४ ऑक्टोबर २०२१ पर्यंत वाढवण्यात आला आहे.

e peek pahani ई पीक पाहणी
e peek pahani ई पीक पाहणी, Image source:APKPure.com

हे पण वाचा:

एखाद्या कंपनीचा IPO येतो म्हणजे नेमकं काय?

MG Astorचे ऑक्टोबरमध्ये लॉन्चिंग? पहा खासियत

राज्यातील मंदिरांच्या बाबतील महत्वपूर्ण निर्णय

यशराजने दिली रणबीरच्या शमशेराची पहिली झलक

आणि म्हणून तलाठी स्तरावरील पीक पाहणीला मान्यता देण्यास सुरवात करावी असे निर्देश सर्व तलाठ्यांना देण्यात यावेत असे ठरवले आहे.

स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने ई पीक पाहणीसाठी माझी शेती, माझा सातबारा, माझा पीक पेरा हे घोषवाक्य ठेवून मोबाइल ॲपचे अनावरण केले होते आणि त्याद्वारे आपल्या उभ्या पिकातून फोटोसहित त्याची माहिती त्यावर अपलोड करण्याची सुविधा शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आली होती.

परंतु त्यानंतर त्यात काही तांत्रिक त्रुटी येत असल्यामुळे शिवाय वर सांगीतल्याप्रमाणे काही अडचणी येत होत्या त्यामुळे शासनाने त्याची मुदत १५ सप्टेंबर वरून ३० सप्टेंबर पर्यंत केली गेली होती.

शेतकरी मात्र निरुत्साही

जरी शासनाने हा उपक्रम आणला असलं तरी बरेच शेतकरी नव्या बदलला स्वीकारताना दिसत नाहीत. काहींच्याकडे तर मोबाईल नसल्यामुळे त्यांना माहिती भरण्यास अडचणी आहेत. शिवाय त्यात ॲप सर्वर कधी कधी डाउन असतो तर त्यातही शेतकरी वैतागून जात आहेत.

पण शेतकऱ्यांनी एक बाब लक्षात घेणे महत्वाचे आहे की ई पीक पाहणी ॲप द्वारे शेतातील पिकांची नोंद आपणांस स्वतः आपल्या शेतात जाऊन करायची आहे.

असे न केल्यास आपल्या ७-१२ मधील पीक पेरा कोर राहील आणि त्यामुळे शेतकऱ्यांना कोणतीही शासकीय मदत, पीक विमा, पीक कर्ज किंवा अनुदान प्राप्त होणार नाही. याची नोंद शेतकऱ्यांनी घेणे महत्वाचे आहे.

शेतकऱ्यांनी प्रत्यक्षात ई पीक पाहणी करण्याची पद्धत

गुगल प्ले स्टोअर वरून तुमच्या मोबाईलमध्ये ई पीक पाहणी ॲप डाउनलोड करा -आपला जिल्हा निवडा -आपला तालुका निवडा -आपला गाव निवडा -खातेदार निवडा किंवा गत नंबर टाका -आपला परिचय निवडा -परत होम पेज वर जा -पिकांची माहिती भरा – खाते क्रमांक निवडा -भूमापण क्रमांक/गट क्रमांक निवडा -मग जमिनीचे एकूण क्षेत्र येईल -पोटखराबा क्षेत्र येईल त्यानंतर हंगाम निवडा -पिकाचा वर्ग निवडा एक पीक असेल तर निर्भेळ पीक म्हणजे एक पीक निवडा. एकापेक्षा जास्त पीक असेल तर बहुपीक पर्याय निवडा -पिकांची नवे निवडा -क्षेत्र भरा -जलसिंचनाचे साधन निवडा -सिंचन पद्धत निवडा -लागवडीचा दिनांक टाका -शेवटी मुख्य पिकाचे छायाचित्र घ्या,आवश्यक छायाचित्र आपल्या मोबाईमध्ये काढताना मोबईलचे जीपीएस किंवा लोकेशन सुरू ठेवणे आवश्यक आहे – मग सर्वांत शेवटी सबमीट करा.    

e peek pahani ई पीक पाहणी
e peek pahani ई पीक पाहणी

ई पीक पाहणी ॲप खाली जाऊन डाउनलोड करा:

E-Peek Pahani – Apps on Google Play

tags:

e peek pahani, e peek online, e peek pahani mobile app, e peek pahani inline, ई पीक पाहणी मोबाईल , ई पीक पाहणी, ई पीक पाहणी मोबाईल ॲप

One thought on “ई पीक नोंदणी करता पुन्हा मुदतवाढ”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *