pagasus बद्दल तुम्हाला माहिती आहे का?
शेअर करा.

भाजप, जासुसी, राहुल गांधी आणि pagasus !

आपल्यापैकी जवळपास सर्व जणांना गुप्तहेरांबद्दल कमालीचं आकर्षण असतं किंबहुना आहे. अगदी आपल्या बहिर्जी नाईकांपासून, शेरलॉक होम्स, ब्योमकेश बक्षी, ते अगदी ००७ समजल्या जाणाऱ्या जेम्स बॉन्ड पर्यंत, सर्वांना गुप्तहेर पात्रे आणि त्यांबद्दल एक विलक्षण आकर्षण पाहायला मिळतं.

शत्रू पक्षावर बारीक नजर ठेवणे, त्यांचे डावपेच समजून घेणे, त्यांचे कच्चे दुवे हेरणे अशा ना ना प्रकारच्या माहिती गुप्तहेरांना गोळा कराव्या लागत व अजूनही कराव्या लागतात. पूर्वी राजे-महाराजे हे गुप्तहेर पाळून असायचे. ते आपल्या शत्रूच्या गोटात, भागात जाऊन गुप्त वार्ता काढायचे आणि आपल्या सैन्याला किंवा राजाला द्यायचे आणि राजा त्या माहितीचा वापर आपलं राज्य वाचवण्यासाठी करायचा.

काळ बदलला तश्या हेरगिरीच्या पद्धतीही बदलल्या. हल्ली प्रत्येक देश आपलं संरक्षण करण्याच्या हेतूने आपल्या मित्र किंवा शत्रू राष्ट्रांवर पाळत म्हणून हेरगिरी करतच असतात.

अशावेळी आता नवनवीन तंत्रज्ञान विकसित होईल तसतसे हेरगिरीचे प्रकारही बदलत जातात.; पण हेरांना आपला जीव कुठेही धोक्यातच घालावा लागतो.

मग वेळप्रसंगी त्यांना आपला जीव सुद्धा धोक्यात घालून ही कामे करावी लागतात. त्यासाठी त्यांना विशेष असे प्रशिक्षण दिले गेलेले असते.
पूर्वीच्या व आत्ताच्या गुप्तहेरांच्या पद्धती यांमध्ये खूप अंतर आहे.

आता गुप्तहेरांबद्दल बोलण्याचं कारण म्हणजे अलीकडच्या काही दिवसांत जोरदार चर्चेचा विषय असलेली एक गोष्ट आणि ती म्हणजे Pegasus नावाचं एक Spyware!

Picture credits: The quint

स्पायवेअर म्हणजे का?

स्पायवेअर हे असं malicious सॉफ्टवेअर आहे जे की तुमच्या कॉम्प्युटर, मोबाईल मध्ये घुसून तुमचं डेटा गोळा करून थर्ड पार्टीला तुमच्या परवानगीशिवाय पाठवतं.

Pegasus हे आत्तापर्यंत बनवलेल्या स्पायवेअर पैकी सर्वात शक्तिशाली आहे म्हणावं लागेल. ते स्मार्टफोन, अँन्ड्रॉईड किंवा ios मध्ये घुसखोरी करून त्यांचा वापर एक पाळतीसाठीचं उपकरण म्हणून करतं.

साधारणपणे ते आपल्या मोबाईलचा ताबा घेऊन आपला मायक्रोफोन, एसएमएस, कॉन्टॅक्ट, कॉल हिस्ट्री, कॅमेरा, इमेल्स, कॅलेंडर आदि चा ताबा मिळवतं आणि मग त्याचा दुरुपयोग केलं जाऊ शकतो.

विशेष म्हणजे द वायर च्या म्हणण्यानुसार २०१९ साली ते spyware वापरुन कॉँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा मोबाईलमधील माहिती गोळा केल्याची शक्यता वर्तवली आहे.

Picture credits: Reuters

Pegasus नेमकं कुणी बनवलं?

Pegasus हे spyware NSO ग्रुप या इस्रायली सॉफ्टवेअर कंपणीनं बनवलेलं असून त्याने जगातील ५० हजार मोबाईल नंबर्स त्यांपैकी भारतातील ३०० नंबर्स लक्ष्य केले आहेत असं म्हटलं गेलंय. मग त्यात विरोधी पक्षातील नेते, काही पत्रकार, काही मंत्री, उद्योगपती अशी बरीच मंडळी आहेत. NSO ग्रुपने त्याची किंमत जवळपास ६० लाख प्रती लायसन्स अशी ठेवली आहे.
ते चर्चेत असं आलं की दोन-एक दिवसांपूर्वी भारतातील बड्या राजकारण्यांचे स्मार्ट फोन हॅक करून काही महत्वाची माहिती गोळा केली असल्याची खबर आणि त्यानंतर तापलेलं राजकारण!

4 thoughts on “Pegasus बद्दल तुम्हाला माहीत आहे का?”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *