DGAFMS Recruitment 2025 : 10वी ते पदवी पाससाठी केंद्रीय नोकरी मिळविण्याची सुवर्णसंधी, आताच अर्ज करा..

DGAFMS Recruitment 2025

DGAFMS Recruitment 2025 : सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा महासंचालनालयात विविध पदांसाठी मोठी भरती

सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा महासंचालनालय (Directorate General of Armed Forces Medical Services – DGAFMS) अंतर्गत विविध गट क (Group C) पदांसाठी मोठी भरती जाहीर झाली आहे. या भरती अंतर्गत विविध पदांसाठी एकूण 113 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.

अर्ज प्रक्रिया आणि महत्त्वाच्या तारखा:

  • अर्ज सुरू होण्याची तारीख: 7 जानेवारी 2025
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 6 फेब्रुवारी 2025
  • परीक्षा होण्याची शक्यता: फेब्रुवारी/मार्च 2025

भरतीसाठी रिक्त पदे आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता:

1) अकाउंटंट (Accountant) – 1 जागा

  • शैक्षणिक पात्रता: B.Com किंवा 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच संबंधित क्षेत्रात 02 वर्षे अनुभव आवश्यक आहे.

2) स्टेनोग्राफर ग्रेड-II (Stenographer Grade-II) – 1 जागा

  • शैक्षणिक पात्रता: 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • कौशल्य चाचणी नियम:
    • डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 शब्द प्रति मिनिट
    • लिप्यंतरण:
      • मॅन्युअल टाइपरायटर: 65 मिनिटे (इंग्रजी), 75 मिनिटे (हिंदी)
      • संगणकावर: 50 मिनिटे (इंग्रजी), 65 मिनिटे (हिंदी)

3) निम्न श्रेणी लिपिक (Lower Division Clerk – LDC) – 11 जागा

  • शैक्षणिक पात्रता: 12वी उत्तीर्ण
  • टायपिंग गती:
    • मॅन्युअल टाइपरायटर: इंग्रजी – 30 शब्द प्रति मिनिट, हिंदी – 25 शब्द प्रति मिनिट
    • संगणकावर: इंग्रजी – 35 शब्द प्रति मिनिट, हिंदी – 30 शब्द प्रति मिनिट

4) स्टोअर कीपर (Store Keeper) – 24 जागा

  • शैक्षणिक पात्रता: 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच संबंधित क्षेत्रात 01 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे.

5) फोटोग्राफर (Photographer) – 1 जागा

  • शैक्षणिक पात्रता: 12वी उत्तीर्ण आणि फोटोग्राफी डिप्लोमा असणे आवश्यक आहे.

6) फायरमन (Fireman) – 5 जागा

  • शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण
  • राज्य अग्निशमन सेवा किंवा सरकारी मान्यताप्राप्त संस्थेत अग्निशमन प्रशिक्षण घेतलेले असावे.
  • सर्व प्रकारच्या अग्निशामक यंत्र, नळी फिटिंग्ज आणि अग्निशामक उपकरणे हाताळण्याचा आणि देखभालीचा अनुभव असावा.

7) कुक (Cook) – 4 जागा

  • शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • संबंधित ट्रेडमध्ये प्रवीणता आवश्यक आहे.

8) लॅब अटेंडंट (Lab Attendant) – 1 जागा

  • शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण
  • 01 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे.

9) मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) – 29 जागा

  • शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण

10) ट्रेड्समन मेट (Tradesman Mate) – 31 जागा

  • शैक्षणिक पात्रता:
    • 10वी उत्तीर्ण
    • ITI (Fitter, Welder, Watch Repairer, Blacksmith, Molder, Cutler, Painter, Tinsmith, Tin and Coppersmith, Carpenter and Joiner, Sawyer)

11) वॉशरमन (Washerman) – 2 जागा

  • शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेडमध्ये प्रवीणता आवश्यक आहे.

12) कारपेंटर & जॉइनर (Carpenter & Joiner) – 2 जागा

  • शैक्षणिक पात्रता:
    • 10वी उत्तीर्ण
    • ITI (Carpenter & Joiner)
    • 03 वर्षे अनुभव आवश्यक आहे.

13) टिन-स्मिथ (Tin-Smith) – 1 जागा

  • शैक्षणिक पात्रता:
    • 10वी उत्तीर्ण
    • ITI (Tinsmith)
    • 03 वर्षे अनुभव आवश्यक आहे.

वयोमर्यादा:

  • अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 06 फेब्रुवारी 2025 रोजी 18 ते 30 वर्षांपर्यंत असावे.
  • श्रेणीनुसार वयोमर्यादेत सवलत:
    • अनुसूचित जाती/जमाती (SC/ST): 05 वर्षे सूट
    • इतर मागासवर्ग (OBC): 03 वर्षे सूट

परीक्षा शुल्क:

  • कोणतीही परीक्षा फी नाही.

पगाराची माहिती:

पदाचे नाववेतनश्रेणी (रुपये)
अकाउंटंट₹29,200 – ₹92,300
स्टेनोग्राफर ग्रेड-II₹25,500 – ₹81,100
निम्न श्रेणी लिपिक₹19,900 – ₹63,200
स्टोअर कीपर₹19,900 – ₹63,200
फोटोग्राफर₹19,900 – ₹63,200
फायरमन₹19,900 – ₹63,200
कुक₹19,900 – ₹63,200
लॅब अटेंडंट₹18,000 – ₹56,900
मल्टी टास्किंग स्टाफ₹18,000 – ₹56,900
ट्रेड्समन मेट₹18,000 – ₹56,900
वॉशरमन₹18,000 – ₹56,900
कारपेंटर & जॉइनर₹18,000 – ₹56,900
टिन-स्मिथ₹18,000 – ₹56,900

नोकरी ठिकाण:

  • संपूर्ण भारतात कुठेही नोकरी मिळू शकते.

अर्ज करण्याची प्रक्रिया:

  • इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल.

अधिकृत संकेतस्थळ आणि अर्ज लिंक:

DGAFMS मध्ये नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे. शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि इतर अटी पूर्ण करणाऱ्या उमेदवारांनी वेळेवर अर्ज करावा.

महत्त्वाची सूचना: अर्ज करण्यापूर्वी अधिकृत अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *