dandpatta favourite maratha weapon
शेअर करा.

दांडपट्टा हे एक मराठ्यांचे आवडीचे हत्यार होते.

शिवाजी महाराजांना जेव्हा विशाळगडावर पोहचेचे होते तेव्हा पावनखिंडीत शत्रूला रोखताना त्यांनी हा दांडपट्टा वापरल्याचे आपल्याला दिसून येते.

आणि म्हणूनच ती म्हण उदयास आली-होता जिवा म्हणून वाचला शिवा.

dandpatta favourite maratha weapon
dandpatta favourite maratha weapon , image source: twitter

जिवा महालाने सय्यद बंडाला मारण्यासाठी वापरले होते हे शस्त्र. शिवाजी महाराजांनी Chhatrapati Shivaji Maharaj जेव्हा अफजल खानचा वध केला त्यावेळी हा सय्यद बंडा आला होता त्यांच्यावर धावून आणि त्या क्षणी प्रसंगावधान दाखवून जिवा महाला यांनी विद्युत वेगाने दांडपट्टा gauntlet sword चालवून त्याचा हात शरीरावेगळा केला होता. who was shivaji maharaj, who killed afjal khan, who is jiwa mahalaa

दांडपट्ट्याची साधारण रचना कशी असते?

दांडपट्ट्याची जर घडणावळ पहायला गेले तर त्याची साधारण लंबी पाच फुटांची असते. त्याचे पाते हे सुमारे चार फुटांचे असते तर त्याची जी मूठ असते ज्याला खोबळा असे म्हटले जाते तो सुमारे एक फुटाचा असतो.

gauntlet sword dandpatta

याचे पाते तलवारीपेक्षा भिन्न असते. ते अगदी लवचिक असते आणि दांडपट्टा चालवताना तो पूर्ण कौशल्याने चालवला गेला तर मात्र त्याच्या वारासरशी उभा माणूस कापला जाऊ शकतो. त्याचे शिर आरामात धडावेगळे केले जाऊ शकते.

तलवारीची आणि दांडपट्ट्याची क्षमता

शस्त्र म्हणून तलवार एका ठिकाणी उत्तम आहे. पण वार करण्याची क्षमता जर पहायला गेलं तर दांडपट्टा तलवारीपेक्षा काकणभर सरस ठरतो.

कारण तलवार चालवण्यासाठी मनगटातून ताकद लावावी लावते तर दांडपट्टा फिरवताना आपला हात त्याच्या खोबळ्यात घालून तो फिरवावा लागटी आणि त्यामुळेच त्याला लागणारी पूर्ण ताकद ही दंडातून आणि खांद्यापासून लावावी लागते. त्यामुळे त्याने होणारा वार हा खूप भयानक स्वरूपाचा होतो.

याचे पाते जरी लवचिक असले तरी ते लपकू न देता जंत फिरवले गेले की समजा एक घाव आणि दोन तुकडे झालेच.

हे पण वाचा:

वाढलेल्या वजनामुळे भाग्यश्री झाली होती ट्रोल, दिले सडेतोड उत्तर

या पाच सवयी तुम्हाला चांगला फोटोग्राफर बनवतील

एखाद्या कंपनीचा IPO येतो म्हणजे नेमकं काय?

पटाईत हा शब्द त्यातून आला

तेव्हा या हत्यारावर जेवढे मराठ्यांचे नियंत्रण होते तेवढे अख्ख्या हिंदुस्तानात कोणाकडे नव्हते. मुघलांच्या राजपूत सैन्यांपैकी काहीजण यामध्ये पटाईत होते हे ही खरं. हा पट्टा फिरवणे हे मोठे कौशल्याचे आणि कसब असलेल्याचे काम आहे आणि त्याचा पूर्ण अभ्यास असलेला माणूसच हे हत्यार व्यवस्थित फिरवू शकतो.

मराठीत आपल्या पटाईत हा शब्द वापरला जातो. त्याचा अर्थ आहे तरबेज.

खरंतर हे दांडपट्टे चालवण्यात माहिर असलेल्यांना पटाईत म्हटले जायचे. पुढे जाऊन मग तो शब्द आपल्या बोली भाषेत रूढ झाला.

एक धारकरी एक पट्टेकरी

मराठीत धारकरी अशा लोकांना म्हटले जायचे जे लोक तलवार, भाला , तीर,कमान किंवा अजून एखाद्या शस्त्रात परांगत असेल तर त्याला धारकरी म्हटले जायचे.

पण जर कुणी फक्त दांडपट्ट्यात पटाईत असलं तर तो दहा धारकऱ्यांना पुरून उरायचा असे म्हटले जायचे.

त्यातूनच ती महान उदयास आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *