Clean Science IPO
Clean Science And Technology, Pune based company
शेअर बाजारात कधी काय होईल याचा काही नेम नाही. कधी कुणी इथे येऊन मालामाल होतो तर कुणी कंगाल होऊन जातो.

सोमवारचा दिवस मार्केटला खाली घेऊन जाणारा ठरला; पण त्यातही एक जबरदस्त घटना अशी घडली की पुणे स्थित क्लीन सायन्स अँड टेक्नॉलॉजी Clean Science And Technology या कंपनीची झालेली धमाकेदार लिस्टिंग!
सन २००३ पासून मान्यताप्राप्त असलेल्या कंपनीचं मुख्यालय मगरपट्टा हडपसर, पुणे येथे असून पुण्यापासून काही अंतरावर असलेल्या कुरकुंभ MIDC येथे त्यांचे उत्पादन कारखाने आहेत.
थोडंसं कंपनीच्या आयपीओ बद्दल जाणून घेऊ..
आयपीओ खुला झाला- ७ जुलै २०२१
आयपीओ बंद झाला- ९ जुलै २०२१
फेस वॅल्यू- १ रुपया
किंमत- ८८० ते ९०० रू
मार्केट लॉट- १६ शेअर्स
किमान गुंतवणूक – १४४०० रू (१ लॉट)
कमाल गुंतवणूक – १,८७,२०० रू (१३ लॉट)
आयपीओ लिस्टिंग तारीख- १९ जुलै २०२१
९ तारखेला आयपीओ बंद झालं तेव्हा तो साधारणपणे ९३ पटीने subscribe केला गेला होता. त्यामुळे जाणकारांच्या मते त्याची धमकेदार लिस्टिंग होणं अपेक्षितच होतं.
जेव्हा सोमवारी सकाळी तो लिस्ट झाला तेव्हा तो १७८४ रू/शेअर वरती ट्रेड करू लागला, म्हणजे जवळपास १०० टक्क्यांनी!

म्हणजे कंपनीच्या लिस्टिंगच्या दिवशी तिने आपल्या गुंतवणूकदारांना १०० टक्के परतावा दिला आहे! २१ दिवसात पैसा डबल करणाऱ्या बऱ्याच फसव्या स्कीम येतात आणि लोक त्याला भुलून जाऊन आपल्या मेहनतीचे पैसे त्यात लाऊन पैसे दुप्पट होण्याची वाट पाहत राहतात; पण इथे खरोखरच पैसे दुप्पट झाल्याचा अनुभव आला असणार खूप जणांना!
असो! आता आपण कंपनी नेमकं करते काय ते थोडक्यात जाणून घेऊयात
जागतिक स्तरावर एक स्पेशालिटी केमिकल्स बनवणारी कंपनी म्हणून क्लीन सायन्स अँड टेक्नॉलॉजी ही चांगली नावारूपाला आलेली कंपनी आहे.
ANISOLE, MONO METHYL ETHER OF HYDROQUINONE (MEHQ), 4-METHOXY ACETOPHENONE (4-MAP) अशी काही केमिकल्स ही कंपनी उत्पादन करते.
कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना भविष्यातही मालामाल करते की नाही हे पाहणे महत्वाचे आहे. डोळे झाकून कुणीही शेअर बाजारात किंवा एखाद्या कंपनीत आपला पैसा लावणं कधीपण जुगार खेळल्यासारखं आहे. त्यामुळे आपले पैसे कंपनीत लावताना त्या कंपनीची आधी माहिती असणे, तिचे ताळेबंद अशा बऱ्याच गोष्टी पाहणे उचित ठरते. कधीही गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणं उचित ठरतं.
टीप : वरील नमूद केलेल्या कंपनीची माहिती ही फक्त माहिती देण्यासाठी होती हे जाणून घ्या. हा कोणताही गुंतवणूक सल्ला समजू नये!