वसंतदादा घराण्याला विकत घ्यायला तुम्हाला बरेच अदानी अंबानी तयार करावे लागतील- विशाल पाटील.
सांगलीतील कार्यकर्ता मेळाव्यात विशालदादा कडाडले.
वसंतदादा घराण्याचं राजकारण ही काही पैशावर निर्माण झालेलं नाही किंवा ते कोणत्याही सत्तेवर टिकले नाही. त्यामुळे जर तुमचा विचार असेल की वसंतदादा घराण्याला विकत घेता येईल तर तो तुमचा गैरसमज आहे.
भाजपला त्यासाठी अजून मोठे घोटाळे करावे लागतील, आदानी अंबानी नव्याने तयार करावे लागतील असेही ते पुढे म्हणाले.
स्व. वसंतदादा यांचे विचार ही काही पैशाने निर्माण झाले नव्हते आणि आज आपल्याला जी गर्दी होते तीही त्यांच्याच विचारांमुळे होते असे ते मेळाव्यात म्हणाले.

मागच्या लोकसभेला खासदार संजयकाका पाटील यांच्यापुढे लोकसभेला उभे ठाकलेले विशाल पाटील हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू आहेत.
नुकतंच त्यांना महाराष्ट्र प्रदेश कॉँग्रेसचं उपाध्यक्ष पद मिळालं आहे आणित्याच निमित्ताने त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांचा मेळावा बोलावला होता व त्यात भाजप वर जहरी टीका केली आहे.
वसंतदादांचं राजकारण विचारांवर बेतलेले ना की पैशावर
बोलताना ते म्हणाले की मला बाहेरच्या पक्षातून बरेच फोन येऊन गेले. त्यामुळे कॉँग्रेसमध्ये भांडणे पण लागली, पण मी मागेही सांगितले होते आणि आत्ताही सांगतो की वसंतदादा घराण्याला विकत घ्यायला भाजपला अजून मोठे घोटाळे करावे लागतील. अजून अदाणी अंबानी तयार करावे लागतील.
काही लोक जे सध्या देश चालवायला बसले आहेत ते फक्त जुना राग काढायला बसले आहेत. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात हे आरएसएसची चड्डी घातलेले लोक ही इंग्रजांसोबत होते. आपल्या दुर्दैवाने आता त्यांना दिल्लीचे तख्त मिळाले आहे असून तेच तख्त त्यांच्याकडून परत मिळवायला आपल्याला कॉँग्रेस प्रदेश उपाध्यक्षपद दिलं गेलं आहे असे ते म्हणाले असे टीव्ही ९ ने म्हटले आहे.
हे पण वाचा:
टकाटक दिग्दर्शकाच्या नवीन चित्रपटाचे पोस्टर आहे ‘एक नंबर’
jio युजर्सना आता नव्या प्लॅन्सवर मिळणार संपूर्ण Disney+hotstar चा खजिना.
वसंतदादा यांनी आपल्या विचारांच्या जोरावर राजकारण केले होते. त्यांच राजकारण पैशावर बिलकुलच बेतलेलं नव्हतं. त्यामुळे विचारांचं राजकारण करणाऱ्या वसंतदादा यांच्या घराण्याला पैशाच्या जोरावर कुणी विकत घेऊ इच्छित असेल तर तो त्यांचा गैरसमज आहे असे त्यांनी आपल्या मेळव्यात स्पष्ट केले.
आपल्या कामाच्याव कार्यकर्त्यांच्या जोरावर आपल्याला ही पद मिळाले असून आपण त्यांच्याच जोरावर पुढे सत्ताही काबिज करू असा विश्वास त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला आहे.
ते म्हणाले की संपूर्ण सांगली जिल्ह्यात अगदी तळागाळापर्यन्त कॉँग्रेस पोहचवू.