सध्या वजनवाढीचा त्रास कुणाला कसा सोसावा लागेल हे काही सांगता येणार नाही.
त्यातही कलाकार मंडळी म्हटलं की त्यांना तर आपल्या वजनावर सतत नियंत्रण ठेवावं लागतंच.
त्यात भर म्हणजे हल्ली सर्व सिने कलाकारांना सोशल मीडियावर सक्रियही राहायचे असते आणि सक्रिय राहण्यासाठी त्यांना सतत आपले फोटो, छोटे विडिओ इन्स्टाग्राम, फेसबुक, ट्वीटर अशा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरती ते काही न काही पोस्ट करत राहत असतात.

त्याद्वारे त्यांना आपले फॅन फॉलोइंग मिळते शिवाय आपल्या फॅन्सना देखील खुश ठेवता येते.
पण गोष्टी तेव्हा बिघडतात जेव्हा काही ट्रोलर्स मंडळीकडून त्यांना ट्रोलिंगची शिकार व्हावे लागते.
बहुतांशी कलाकार मंडळी अशा ट्रोलर्स कडे बिलकुलच लक्ष देत नाहीत. आपल्या प्रामाणिक फॅन्सचा विचार करून ते सतत काही ना काही टाकत राहतात.
पण कधी कधी अशा उपद्रवी ट्रोलर्सना देखील पद्धतशीर धडा शिकवणे गरजेचे असते.
भाग्यश्रीचे काय झाले:
मराठमोळी अभिनेत्री भाग्यश्री मोटे सुद्धा इन्स्टाग्राम वरती चांगलीच अॅक्टिव असते.
मराठी इंडस्ट्री मध्ये काम करता करता ती दक्षिणेतही काही प्रोजेक्ट्स वर काम करत असते.
भाग्यश्री देखील अशा ट्रोलर्स पासून वाचलेली नाही. तिला तिच्या वाढलेल्या वजनामुळे ट्रोलर्स कडून सतत ट्रोल केले जात होते.
तिने एका इन्स्टाग्राम पोस्ट द्वारे अशा ट्रोलर्सना चांगलेच सुनावले आहे.
हे पण वाचा:
एयर इंडियाचा ताबा पुन्हा टाटा कडे
या पाच सवयी तुम्हाला चांगला फोटोग्राफर बनवतील
हॉटेलमध्ये चेक इन आणि चेक आउट करताना हे टाळा
एखाद्या कंपनीचा IPO येतो म्हणजे नेमकं काय?
ती त्यात म्हणते की, माझं अशा लोकांना सांगणं आहे जे सतत माझ्या शरीराबद्दल आणि माझ्या वाढलेल्या वजनाबद्दल बोलत असतात. होय माझं वजन वाढलं आहे. मागील दोन महिन्यांपासून मी काही गोष्टींचा सामना करते आहे जसे की माझ्या पोटाच्या विकारामुळे मला माझे डायट पाळणे अवघड झाले होते आणि आजारादरम्यानच्या आहारामुळे माझे वजन वाढले आहे. पण तुम्ही निश्चिंत असा मी लवकरच माझे वजन पूर्वीच्या पातळीवर आनेल.
ती पुढे हे ही म्हणते की, मी कशी जरी असले तरी मी मला स्वतःला तसे स्वीकारले आहे मग तुम्ही मला स्वीकारा किंवा नको, मला काही फरक पडत नाही.
मागील काही दिवसांत टॅटूमूळेही झाली होती ट्रोल:
नुकताच तिने आपल्या शरीरावर महामृत्युंजय मंत्राचा टॅटू गोंदवून घेतलं होता आणि त्या कारणासाठीही ती ट्रोल झाली होती.
बॉलीवूड मध्येही करणार पदार्पण:
लवकरच ती प्रतीक गांधी सोबत रावणलीला या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची माहिती आहे. त्यासाठी तिला शुभेच्छा.
[…] वाढलेल्या वजनामुळे भाग्यश्री झाली हो… […]