सुनंदन लेले यांनी मॅंचेस्टर, अल्ट्रीन्चम मधून पोस्ट केला खुर्चीचा व्हिडिओ.
व्हिडिओ झाला आहे इंटेरनेटवर व्हायरल आणि येत आहेत एका वरचढ एक कमेंट्स.

त्याचं असं झालं की जेष्ठ क्रिकेट विश्लेषक सुनंदन लेले Sunandan Lele यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंट Twitter Account वरुन मॅंचेस्टर, अल्ट्रीन्चम Altrincham, Manchester मधून एक खुर्चीचा व्हिडिओ २३ सप्टेंबरला पोस्ट केला होता. Viral video of Balu lokhande’s chair
त्यात एक जुनी पत्र्याची खुर्ची ते दाखवत आहेत ज्या खुर्चीच्या मागे बाळू लोखंडे, सावळज balu lokhande sawlaj असे मराठीमध्ये लिहिले viral video आहे.
जेव्हा हा व्हिडिओ सोशल मिडियावर social media शेअर झाला आणि सगळीकडे एकच चर्चा उठली की हे बाळू लोखंडे आहेत तरी कोण? who is balu lokhande आणि त्यातच हा व्हिडिओ व्हायरल झाला.
हे पण वाचा:
राज्यातील मंदिरांच्या बाबतील महत्वपूर्ण निर्णय
सत्तर रुपये वारून झाली ३३ वर्षे
Infosys ने जाहीर केले विद्यार्थ्यांसाठी Online course
त्यावर ओंकार माळी या ट्वीटर वापरकर्त्याने, सुनंदन लेले सरांनी लंडनमधील एका कॅफेचा व्हिडिओ शेर केला, त्यातल्या एका लोखंडी खुर्चीवर “बाळु लोखंडे, सावळज” अस लिहिलं आहे. हे माझ्या मुळ गावातील मंडप डेकोरेशन व्यवसायत आहेत, आता आमच्या गावात एक चर्चा चालू आहे की ही खुर्ची सावळज मधून लंडन मध्ये कशी पोहचली! अशा आशयाचे कॅप्शन देऊन तोच व्हिडिओ पोस्ट केला आहे.
काय आहे नेमकी त्यामागची गोष्ट?
सांगली sangli district येथील तासगाव तालुक्यातील tasgaon taluka सावळजमधल्या बाळू लोखंडे यांचा मंडप डेकोरेशनचा mandap decoration व्यवसाय आहे. व्हिडिओ मध्ये जी खुर्ची दिसत आहे ती खुर्ची त्यांनी साधारण पंधरा वर्षांपूर्वी त्यांनी भंगारात विकली होती.
पण त्यांना याची मुळीच कल्पना नव्हती की त्यांनी पंधरा वर्षांपूर्वी भंगारात विकलेली ती खुर्ची आज मॅंचेस्टर मध्ये एका रेस्टॉरंटच्या बाहेर आढळेल.
वृत्तवाहिन्यांशी बोलताना त्यांनी हेच सांगितले की, पंधरा वर्षांपूर्वी भंगारात दिलेली खुर्ची इंग्लंडला जाईल याची काही अपेक्षा नव्हती. मात्र जेव्हा सुनंदन लेले यांनी तो व्हिडिओ पोस्ट केला तेव्हा ती खुर्ची पाहून आपल्याला खूप समाधान वाटले असे ते पुढे म्हणाले. त्याबद्दल त्यांनी लेले यांचे आभार देखील मानले आहेत.
एकदाचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आणि सुरू झाला नेटकऱ्यांच्या भन्नाट कॅमेन्टचा पाऊस. अभिनेते सुमित राघवन sumit raghavan यांनी, देवा परमेश्वरा कोहिनूरच नव्हे तर ब्रिटिशांनी खुर्च्या पण चोरल्या अशा आशयाची कमेंट केली आहे.
एका तर ट्वीटर वापरकर्त्याने लेले यांना तर ताटे आणि वाट्या पण शोधायला सांगितल्या आहेत.

एकीने तर म्हटले आहे की वऱ्हाड निघालं लंडनला varhad nighala londanla या नाटकाच्या प्रयोगासाठी ही खुर्ची तिकडे नेली असेल अशी शक्यता वर्तवली आहे.

अजून एक अशी शक्यता आहे की कुणी तरी एका बनेल भंगारवाल्याने एका इंग्रजाला चांगलीच टोपी घातली आहे आणि ही खुर्ची त्याच्या गळ्यात घातली असावी असे म्हटले आहे.
असो जगात कुठली वस्तु कुठे सापडेल याचा काही नेम नाही असंच म्हणावं लागेल असं तरी या खुर्चीच्या उदाहरणावरून दिसून येत आहे.