Armed Forces Bharti 2025: सशस्त्र सेना अंतर्गत गट ‘सी’ पदांसाठी 113 रिक्त जागा भरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. 10वी, 12वी, किंवा पदवीधर उमेदवारांसाठी सरकारी नोकरी मिळवण्याची ही उत्तम संधी आहे. या भरतीची जाहिरात सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा महासंचालनालय (DGAFMS) द्वारे प्रसिद्ध झाली आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. अधिकृत जाहिरात आणि ऑनलाईन अर्जाची लिंक खाली उपलब्ध आहे.
■ भरती विभाग: सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा महासंचालनालय (DGAFMS).
■ भरती प्रकार: सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी सुनहरी संधी.
■ भरती श्रेणी: केंद्र सरकारच्या अंतर्गत भरती प्रक्रिया.
■ पदे: गट ‘सी’ अंतर्गत विविध पदे.
■ शैक्षणिक पात्रता: 10वी, 12वी, पदवीधर किंवा इतर आवश्यक पात्रता (सविस्तर माहिती जाहिरातीत दिली आहे).
■ मासिक वेतन: ₹18,000 ते ₹56,900 (पदांनुसार वेतनश्रेणी वेगळी आहे).
■ अर्ज पद्धती: फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करता येईल.
■ वयोमर्यादा: 18 ते 30 वर्षे.
■ भरती कालावधी: कायमस्वरूपी (Permanent).
■ पदाचे तपशील: लेखापाल, स्टेनोग्राफर ग्रेड-I, निम्न विभाग लिपिक, स्टोअर कीपर, छायाचित्रकार, फायरमन, कूक, लॅब अटेंडंट, मल्टी टास्किंग स्टाफ, ट्रेडसमन मेटवॉशरमन, कारपेंटर, आणि जॉइनर टीन स्मिथ.
■ शैक्षणिक पात्रतेचा तपशील:
- लेखापाल: 12वी आणि पदवी उत्तीर्ण.
- स्टेनोग्राफर ग्रेड-I, निम्न विभाग लिपिक, स्टोअर कीपर: 12वी उत्तीर्ण.
- छायाचित्रकार: 12वी व डिप्लोमा.
- फायरमन, कूक, लॅब अटेंडंट, इतर पदे: 10वी उत्तीर्ण.
■ एकूण पदे: 113.
■ निवड प्रक्रिया:
- 100 गुणांची लेखी परीक्षा.
- टायपिंग चाचणी/शॉर्टहँड चाचणी/ट्रेड चाचणी (पदांनुसार लागू).
■ लेखी परीक्षेचा स्वरूप:
- सामान्य बुद्धिमत्ता व तर्कशक्ती
- संख्यात्मक योग्यता
- सामान्य इंग्रजी
- सामान्य जागरूकता
■ स्पर्धात्मक परीक्षेनंतर:
- पात्र उमेदवारांना ट्रेड चाचणीसाठी बोलावले जाईल.
- ही चाचणी रिक्त पदांच्या पाच ते सात पट उमेदवारांसाठी घेतली जाईल.
■ इतर महत्त्वाचे मुद्दे:
- अपूर्ण अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
- लेखी परीक्षा किंवा चाचणीसाठी TA/DA दिले जाणार नाही.
- अर्ज केलेला उमेदवार अखिल भारतीय सेवा दायित्वाच्या अधीन असेल.
■ परीक्षा कालावधी: फेब्रुवारी/मार्च 2025.
■ हेल्पलाइन नंबर: 022-82507779 (अर्जासंबंधी प्रश्नांसाठी).
■ अर्ज करण्याची अंतिम तारीख: 6 फेब्रुवारी 2025.
■ अधिकृत माहिती: सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि ऑनलाईन अर्ज लिंकचा वापर करावा.