आनंद महिंद्रा नीरजला देणार ही कोरी करकरीत गाडी.
महिंद्रा एंड महिंद्रा (mahindra and mahindra) चे सर्वेसर्वा असलेले आणि भारताचे एक प्रथितयश उद्योगपती आनंद महिंद्रा (anand mahindra) हे आपल्या सर्वांच्या परिचयाचे आहेत.
त्याही पेक्षा ते आपल्या बेधडक आणि आपल्या चांगल्या स्वभावानेही खूप जणांना परिचयाचे आहेत.
आनंद महिंद्रा हे ट्वीटर वर अॅक्टिव असतात आणि ते त्याच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी सतत संवादही साधत असतात. ट्वीटरवर संवाद साधायची त्यांची खास हटके शैली आहे आणि ती लोकांनाही आवडते.
सामान्य लोकांच्या ट्विट ला प्रतिसाद देणाऱ्या फार कमी लोकांपैकी ते एक आहेत.
हे पण वाचा:
गोल्डमॅन नीरज चोप्रा, टोकियो ऑलिंपिक मध्ये भारताला पहिलं सुवर्ण
खेलरत्न पुरस्कार आता मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार
गावसकरांनी केली सौरव गांगुलीची तक्रार
त्याचं असं झालं की काल भारताच्या नीरज चोप्रा ने भालाफेकीत टोकियो ऑलिंपिक मध्ये भारताला सुवर्ण पदक मिळवून दिले. त्या स्पर्धेतील भारताचं ते एकमेव सुवर्ण पदक आहे.
त्याच्या त्या विजयाने संपूर्ण देशभरात आनंदाचे व जल्लोषाचे वातावरण आहे. सर्वत्र त्याच्या अभिनंदनाचे आणि कौतुकाचे मेसेजेस व्हाटस अप (whats app), फेसबुक (facebook), ट्वीटर(twitter)वरती फिरत आहेत.
देशभरातील बड्या लोकांनी त्याचे प्रत्यक्ष,अप्रत्यक्ष आभार मानले आहेत. आनंद महिंद्रा यांनी त्याचे अभिनंदन करताना खालील ट्विट केले होते.
त्यांच्या या ट्विट खाली एका ट्वीटर वापरकर्त्याने महिंद्रा XUV 700 ही एसयूव्ही(SUV) कार देण्याची मागणी केली होती.

मग लगेच आनंद महिंद्रा यांनी त्याला प्रतिसाद म्हणून एक ट्विट केलं आहे. त्यात ते म्हणतात की, हो देणारच, आपल्या सुवर्ण पदक विजेत्या खेळाडूला महिंद्राची महिंद्रा XUV 700 भेट देणं माझ्यासाठी विशेष सन्मानाची बाब असेल.
त्या ट्विटमधूनच त्यांनी महिंद्रा एंड महिंद्रा (mahindra and mahindra) चे एक्झिक्युटिव डायरेक्टर राजेश जेजूरीकर यांना व विजय नकरा यांना टॅग करून त्यांना एक XUV 700 नीरज साठी तयार ठेवण्यास सांगितले आहे.
एखाद्या खेळाडूला किंवा व्यक्तीला त्यांच्याकडून अशी भेट मिळण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. त्यांनी याअगोदर ही असं लोकांना आश्चर्यचकित केलं आहे. क्रिकेटपट्टू नटराजन हा त्यापैकी एक आहे.
पाठीमागे जेव्हा सिंधु ने कास्य पदक मिळवले होते तेव्हाही चाहत्यांकडून त्यांना महिंद्रा THAR तिला भेट करण्याबाबत विचारले होते पण त्यांनी त्यावर तिच्याकडे आधीच एक THAR चे मॉडेल असल्याचे सांगितले होते.
नेटवर आनंद महिंद्रा यांच्या नवे लोक असे काही शोधत असतात, anand mahindra twitter, anand mahindra son, anand mahindra daughter,anand mahindra net worth, महिंद्रा एंड महिंद्रा.
[…] […]
[…] […]