सर्वप्रथम सर्व विठ्ठल भक्तांना,वारकरी मंडळींना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा!
पालखीचा हा व्हिडिओ पहिला का?
कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी वारकरी जणांना आपल्या लाडक्या पांडुरंगाचे दर्शन घ्यायला मिळणार नाही ना त्याच्या चरणी मस्तक ठेवायला मिळणार आहे.
गेल्या वर्षी कोरोनाची पहिली लाट असल्या कारणाने शेकडो वर्षांची असलेली पालखीची पायी नेण्याची परंपरा खंडित झाली होती. गेल्या वर्षी ज्ञानदेव व तुकोबाराय यांच्या पादुका एस टी मधून पंढरपूरला नेण्यात आल्या होत्या.
या वर्षी कोरोनाची दुसरी लाट तीव्र आल्यामुळे संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता राज्य शासनाने पायी पालखी नेण्यास तसेच पायी दिंडी नेण्यास परवानगी नाकारली. तसेच गतवर्षीप्रमाणे पालखी व पादुका एस टी मधूनच पंढरपुरी नेण्यास सूचना केल्या.
ठरल्याप्रमाणे देहू व आळंदीहुन एस टीने पादुका दिनांक १९ जुलै ला कडेकोट बंदोबस्तात पंढरपूरला नेल्या गेल्या. पालखी जात असताना पालखी मार्गात भाविकांनी पालखीच्या दर्शनासाठी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केलेली पाहायला मिळाली.
जेजूरी येथे पालखीचे आगमन होताच भाविकांनी भंडाऱ्याची मुक्त उधळण केली. पायी वारीचा अनुभव भलेही वारकरी अनुभवत नसला तरी नव्या पद्धतीची वारीही त्याने तितक्याच भक्तिभावाने स्वीकारली आहे असे म्हणायला हरकत नाही.
पालखीचे जेजूरीत आगमन..
आषाढी वारीचे live क्षण इथे अनुभवा…
शासकीय पूजा करण्यासाठी मुख्यमंत्री मा. श्री. उद्धव ठाकरे हेलिकॉप्टरने पंढरपूरला रवाना होतील.!असं सांगितलं गेलेलं; पण मुख्यमंत्री आपल्या ताफ्यासह स्वतः गाडी चालवत पंढरपूरास पोहचले.!
दरवर्षी लाखों भाविकांची चंद्रभागेच्या वाळवंटी होणारी गर्दी, भजनामध्ये तल्लीन झालेले वारकरी, टाळ मृदंगाच्या आवाजाने दुमदुमणारी पंढरी सलग दोन वर्षे यापासून दूर राहिली आहे. वारकरी डोळ्यांत आस लाऊन बसला आहे.
कोरोनाची महामारी लवकर संपू दे आणि सुनी पडलेली पंढरी पुन्हा एकदा दुमदुमू दे!