A Spike In Sachin’s Life! काय आहे तो स्पाईक?
माणसाच्या आयुष्यात कधी काय होईल याचा काही नेम नाही. कोण कधी एखाद्याच्या आयुष्यात येत असतो तर कोण अचानकपणे एखाद्याच्या आयुष्यातून निघूनही जात असतो.
माणसाला आपलं आयुष्य जगण्यासाठी मात्र आयुष्यात वेळोवेळी स्पाईक येणं खूप महत्वाचं असतं. आयुष्यात स्पाईक नसेल तर आयुष्य नीरस व रटाळ झाल्यासारखं वाटतं..
एखादं साहसी, आज कुछ तुफानी करते है प्रकारचं काम करण्यासाठी किंवा आपल्या आयुष्यात योग्य ध्येयापर्यंत पोहचण्यासाठी साधारणपणे आपल्याला आपल्या आयुष्यात एखादा स्पाईक येणं खूप गरजेचं असतं.
आपला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर याच्याही आयुष्यात एक असाच स्पाईक आला आहे.!

आता तुम्ही म्हणाल की सचिन तर रिटायर होऊन बरीच वर्षे झाली, आता अजून कसला स्पाईक आला त्याच्या आयुष्यात? तो काय पुनरागामनाचा विचार बिचार करतो आहे की काय?
तर असं बिलकूलच नाहीये. मात्र सचिनच्या आयुष्यात खरंच एक स्पाईक आला आहे हे मात्र एकदम खरं आहे. खुद्द सचिननेच दोन दिवसांपूर्वी एक ट्विट करून हे स्पष्ट केलं आहे.
माझा नवीन पावटनर (अर्थात पार्टनर), स्पाईक आज सोशल मिडियावरती त्याचं पदार्पण करत आहे. हाय कर!
अशा मथळ्याखाली त्याने आपल्या नवीन कुत्र्याच्या पिल्ल्याचा एक फोटो ट्विट केला आहे.
पुढे अजून एक व्हिडिओ ट्विट करत त्याने स्पाईक ची कहाणी सांगितली आहे. त्यात तो सांगतो की त्याच्या फार्म हाऊस ची देखभाल करणाऱ्या लोकांची मुले बाजारात गेली असता त्यांना तिथे ते पिल्लू भेटलं.
त्याच्या आईचा मृत्यू झाल्यामुळे ते बिचारं पिल्लू अनाथ झालं होतं. ती मुले त्याला तिथून आपल्यासोबत घेऊन आली आणि त्यांनी त्याची सचिनशी भेट करवली. त्याला पाहून सचिन म्हणाला की ते पिल्लू आपल्यासोबतच राहील. इथून ते कुठेही जाणार नाही.
पुढे सचिन हेही सांगायला विसरला नाही की स्पाईक हा काही विदेशी जातीचा कुत्रा नसून तो एक अस्सल देशी आहे. तो खूप चांगला कुत्रा असून तो खूप सुंदररित्या वाढत आहे. त्याला आता फक्त अन्न, निवारा आणि खूप साऱ्या प्रेमाची गरज आहे.
स्पाईक ने त्याचे व बाकी कुटुंबियांची मने जिंकली असून त्याने त्यांच्या आयुष्यात येऊन त्यांचं आयुष्य बदलवून टाकलंय असे शेवटी सचिनने नमूद केलं आहे.
त्याने म्हटल्याप्रमाणे स्पाईक हा खूप मजेत इतरत्र खेळताना दिसत आहे! जणू तो त्याच्याशी एकरूप झाला आहे.
तुमच्याही जीवनात तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत नेणारा स्पाईक नक्की येवो अशी आपण अपेक्षा करूया!
हे ही वाचा.
तुम्ही Ola Scooter बुक केली का?
चीनची कियान यांग टोकियो ऑलिंपिकची पहिली सुवर्णपदक विजेती!
टोकियो ऑलिंपिक मध्ये भारतानं खातं उघडलं.!
[…] सचिनच्या जीवनात आला एक स्पाईक […]
[…] सचिनच्या जीवनात आला एक स्पाईक […]
[…] सचिन तेंडुलकर ने ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. […]