Mahila balvikas Vibhag Bharti 2025 : महिला व बाल विकास विभागाच्या अधिपत्याखालील नवीन पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले असून, ही सरकारी विभागात काम करण्याची मोठी संधी आहे. ही भरती प्रक्रिया महिला व बाल विकास महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी अधिकृतपणे जाहीर केली आहे. अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
भरतीविषयक तपशील:
- भरती विभाग: महिला व बाल विकास महाराष्ट्र राज्य, पुणे
- भरती प्रकार: सरकारी नोकरीची संधी
- भरती श्रेणी: महाराष्ट्र शासन – राज्य सरकार अंतर्गत
- पदाचे नाव: अध्यक्ष आणि सदस्य
- शैक्षणिक पात्रता: किमान पदवीधर (अधिक माहिती जाहिरातीत)
- अर्ज पद्धती: ऑफलाइन
अधिक तपशील:
- वयोमर्यादा: 65 वर्षांपर्यंतचे उमेदवार अर्ज करू शकतात.
- अर्ज सुरू: 2 जानेवारी 2025 पासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.
- एकूण पदसंख्या: 7 रिक्त पदे
- नोकरी ठिकाण: पुणे
अध्यक्ष पदासाठी पात्रता:
बालक कल्याण व विकासाशी संबंधित उत्कृष्ट कार्य करणारी प्रतिष्ठित व्यक्ती असावी.
सदस्य पदासाठी पात्रता:
- किमान पदवीधर असणे आवश्यक
- दोन वेळा अध्यक्ष/सदस्य राहिलेली व्यक्ती पुन्हा पात्र नाही.
महत्त्वाच्या तारखा:
- अर्ज करण्याची अंतिम तारीख: 16 जानेवारी 2025
- अधिकृत जाहिरात आणि माहिती: www.maharashtra.gov.in आणि www.wcdcommpune.com
अर्ज पाठवण्याचा पत्ता:
आयुक्त कार्यालय, महिला व बाल विकास आयुक्तालय,
28- राणीची बाग, जुन्या सर्किट हाऊसजवळ,
महाराष्ट्र राज्य, पुणे – 1
अधिक माहितीसाठी व सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी वरील संकेतस्थळांना भेट द्या.