Adivasi Vikas Vibhag Bharti 2025: आदिवासी विकास विभाग अंतर्गत सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी यांचे कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धारणी यांच्या अंतर्गत नवीन पद भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. निवड झालेल्या उमेदवारांना मासिक वेतन ₹25,000 दिले जाईल. पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
महत्त्वाचे तपशील:
- भरती विभाग: आदिवासी विकास विभाग, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी यांचे कार्यालय, धारणी.
- पदाचे नाव: विधि तज्ञ तथा सल्लागार.
- शैक्षणिक पात्रता:
- मान्यताप्राप्त विद्यापीठाची विधि शाखेची पदवी किंवा पदव्युत्तर पदवी.
- संबंधित क्षेत्रात किमान 3 वर्षांचा अनुभव आवश्यक.
- शासकीय सेवेतून सेवानिवृत्त विधि सल्लागार किंवा स्थानिक न्यायालयीन क्षेत्रातील उमेदवारांना प्राधान्य.
- मासिक मानधन: ₹25,000.
- एकूण पदे: 01 जागा.
- वयोमर्यादा: किमान 21 ते कमाल 65 वर्षे.
- भरती कालावधी: 11 महिन्यांची हंगामी नेमणूक.
नोकरीचे ठिकाण:
सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, धारणी, जि. अमरावती.
अर्ज प्रक्रिया:
- पद्धत: ऑनलाईन किंवा ऑफलाईन.
- ऑनलाईन अर्ज पत्ता: poitdp.dharni-mh@gov.in
- ऑफलाईन अर्ज पाठवण्याचा पत्ता:
प्रकल्प एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, धारणी, जि. अमरावती. - अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख: 20 जानेवारी 2025.
सर्वसाधारण अटी व शर्ती:
- न्यायालयीन प्रकरणांमध्ये विभागाची बाजू मांडणे, प्रतिज्ञापत्र तयार करणे, आणि ते मान्यतेसाठी सादर करणे.
- न्यायालयीन सुनावणीच्या ठिकाणी उपस्थित राहणे आणि प्रकरणे हाताळणे.
- विभागीय वादांसाठी कायदेशीर मसुदे तयार करणे व मार्गदर्शन करणे.
- कर्मचाऱ्यांसाठी कायदेविषयक विश्लेषण व मार्गदर्शन करणे.
- कायदेविषयक सुचना आणि आदेशांचे पालन करणे बंधनकारक आहे.
- वरिष्ठांनी दिलेली कामे व जबाबदाऱ्या पूर्ण करणे.
टीप: निवड झालेल्या उमेदवाराला धारणी प्रकल्प कार्यक्षेत्रात राहणे बंधनकारक आहे. निवासस्थान उपलब्ध करून देण्याची जबाबदारी कार्यालयाची नसेल.