Rajyaseva Aayog Exam to be held on September 4,2021.
5 things to do before appearing MPSC Exam.
बहुप्रतिक्षित अशी आणि पार राजकारणाचा केंद्रबिंदु ठरलेली महाराष्ट्र राज्यसेवा आयोगाची परीक्षा- MPSC अखेर ठरल्याप्रमाणे होणार आहे.
महाराष्ट्र शासनाने- Govt. of Maharashtra आधीच या परीक्षेची तारीख जाहीर करून दिली आहे आणि आता काहीही झालं तरी ही परीक्षा याच तारखेला होणार हेही सांगितलं आहे.
दरवर्षी लाखोंच्या संख्येने या परीक्षेला विद्यार्थी बसत असतात. कमालीची स्पर्धा असलेल्या या परीक्षेत मात्र सर्वांनाच यश काही मिळत नाही हे ही तितकंच खरं आहे.

जर तुम्ही या परीक्षेला बसणार असाल तर तुम्ही हा ब्लॉग पूर्ण वाचायला हवा.
यात आपण परीक्षेच्या आधी करण्याच्या पाच गोष्टी सांगितल्या आहेत आणि त्या खालीलप्रमाणे आहेत. 5 things to do before appearing mpsc exam
हॉल तिकीट: Hall Ticket
आयोगाचा तुम्हाला हॉल तिकीटासंदर्भात मेसेज अथवा मेल आला असेलच.
जर आपलं हॉल तिकीट ऑनलाइन उपलब्ध असेल तर कोणताही विलंब न करता आपलं हॉल तिकीट आधी डाउनलोड करून घ्या व त्याच्या एक नाही दोन नाही तर तीन प्रती किंवा त्यांची झेरॉक्स मारून तुमच्याजवळ ठेवा.
काय होतंय, बघू पुन्हा, अजून वेळ आहे की अशा भ्रमात बिलकून राहू नका.
अचानक तुम्ही त्याची प्रत सोबत घयाईची विसरला तर पुन्हा परीक्षा केंद्रावर उगाचच तुमची धावपळ होईल आणि त्याचा परिणाम तुमच्या पेपर वर होईल.
नवीन विषय टाळा: Avoid Handling New Topics
शक्यतो परीक्षेच्या आधी नवीन विषयाला हात घालण्याचे टाळा.
अशाने कदाचित तुम्हाला दडपण येऊ शकतं आणि तुमचा झालेला अभ्यासही तुम्हाला कमी वाटू लागेल. परिणामी तुमची चलबिचल होऊन तुम्हाला येणाऱ्या गोष्टीही तुम्ही विसराल.
अशा वेळी जर नवीन विषय हाताळत असाल तर त्यात जास्त खोलात जाणे टाळा.
आणि महत्वाचं म्हणजे नवीन विषय हाताळताना शक्यतो कमी मुद्दे हाताळा जेणेकरून जेवढी तयारी होईल ती किमान समाधानकारक होईल.
नोट्स आणि उजळणी: Notes and Revisions
आत्तापर्यंत तुम्ही अभ्यास करताना काढलेल्या नोट्स एकदा तुम्ही तुमच्या डोळ्याखालून नक्की घालवा.
विषयांचा अभ्यास करताना तुम्हाला महत्वाचे वाटलेले मुद्दे तुम्ही आपल्या नोट्स मध्ये लिहून काढलेले असतात आणि आपल्या नोट्सचं आकलन आपल्यालाच चांगलं असतं त्यामुळे त्या नोट्सची उजळणी करणे बिलकुल टाळू नका.
पुरेशी झोप: Ample amount of sleep
परीक्षेच्या आधी खूप जागरण टाळा.
तुम्हाला माहीत असतं आपला किती अभ्यास झाला आहे नि किती बाकी आहे. त्यामुळे विनाकारण शरीराला त्रास होईल इतक्या वेळ जागरण करून अभ्यास करणे टाळा.
आपलं शांत आणि प्रसन्न ठेवण्यासाठी पुरेशी झोप ही घ्याच!
हे पण वाचा:
सकाळी लवकर उठायचंय मग या पाच गोष्टी कराच
सचिनला फोन करून मदत माग, गावसकरांचा या खेळाडूला सल्ला
5 Highly Recommended English Practice Apps तुमचं इंग्लिश सुधरविण्यासाठी
झोप टाळून तुम्ही भले अभ्यास करालही पण; तो अभ्यास म्हणजे नुसतं वाचन असेल त्याच्या पलीकडे काही नसेल.
जास्तीच्या जगरणाने कदाचित तुम्ही प्रकृती बिघडण्याची पण शक्यता जास्त आहे आणि ऐन परीक्षेच्या तोंडावर आजारी पडणे कुणाला परवडेल?
परीक्षा केंद्रावर वेळेत पोहचा: Be timely on the exam centre
आयोगाच्या परीक्षा प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी घेतल्या जातात. त्यामुळे असं शक्यतो होत नाही की परीक्षा केंद्र फार दूर पडलं.
पण तरीही केंद्रावर पोहाचायला वेळ होऊ नये म्हणून साधारण पाऊण तास आधीच पोहचण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
कारण परीक्षा केंद्रावर आपला नंबर कोणत्या हॉल मध्ये आहे हे ही शोधण्यात बराच वेळ खर्ची पडतो कधी कधी.
कधी मग वाहन खराब होऊन उशीर झाला तर आपल्या वर्षभराची मेहनत पाण्यात नको जायला म्हणून परीक्षेच्या केंद्रावर आधीच पोहचा!
वरील पाच बाबी कटाक्षाने लक्षात असुदया. म्हणजे आपल्याला परीक्षेच्या दिवशी होणारी मानसिक ओढाताण टाळता येईल.