5 steps to wake up early in the morning
शेअर करा.

सकाळी लवकर उठून आपल्या दिवसाची चांगली सुरवात कुणाला करू वाटणार नाही.?

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात आपण मोबाईलवर किंवा टीव्ही वर काही ना काही कार्यक्रम पाहत उशिरा झोपून जातो आणि मग सकाळी उशिरा उठतो.

जगातील काही यशस्वी लोकांची उदाहरणे घेतली तर आपल्याला पाहायला मिळेल की हे यशस्वी लोक आपल्या दिवसाची सुरवात शक्य तितक्या लवकर करत होते किंवा अजूनही करतात.

आपल्याला आपलं आरोग्य निरोगी आणि उत्साही बनवायचं असेल तर आपल्याला दररोज सकाळी लवकर उठून काही चांगल्या सवयी अंगी बाळगल्या पाहिजेत.

पण या सर्व गोष्टी झाल्या बोलण्यापूरत्या. सकाळी जेव्हा लवकर उठायची वेळ येते तेव्हा मात्र आपण अजून पाच मिनिटे म्हणत म्हणत उशिरा उठलेलोच कळत नाही आणि मग संपूर्ण दिवस आळसात आणि कामे रेंगाळण्यातच घालवतो.

जर आपल्याला सकाळी लवकर उठायची सवय लावायची असेल मात्र त्यासाठी आपणांस अडचणी येत असतील तर हा ब्लॉग पूर्ण वाचा.

खालील पाच गोष्टी तुम्ही कटाक्षाने पाळा आणि पहा तुम्हाला सकाळी लवकर उठायची सवय आपोआप जडलेली असेल. 5 steps to wake up early in the morning

5 steps to wake up early in the morning
5 steps to wake up early in the morning image source: prevention.com

मानाचं घडयाळ: A mind clock

दररोज आपल्या मोबाईलमध्ये किंवा घड्याळात आपण अलार्म लाऊन झोपतो पण नेहमी आपलं असं होतं की जेव्हा अलार्म वाजू लागतो तेव्हा मात्र आपण तो सरळ बंद करून झोपून जातो किंवा स्नूझ करून थोड्या वेळाने उठू असा विचार करून झोपतो.

तुम्हाला माहीत आहे का की मोबाईलच्या अलार्म पेक्षा अजून एक खूप परिणामकारक अलार्म आहे ज्याची मदत आपण लवकर उठण्यासाठी घेऊ शकतो.

आपण ज्या घड्याळाची गोष्ट करत आहे ते घडयाळ म्हणजे दुसरं तिसरं काही काही नसून आपले शरीरच आहे.

आता तुम्ही म्हणाल की हे कसं शक्य आहे पण मित्रांनो हे खरच शक्य आहे.

रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही तुमच्या मनाला वारंवार सांगा की आपल्याला सकाळी काहीही करून लवकर उठायचे आहे.

हे पण वाचा:

सचिनला फोन करून मदत माग, गावसकरांचा या खेळाडूला सल्ला

5 Highly Recommended English Practice Apps तुमचं इंग्लिश सुधरविण्यासाठी

Spider-Man No Way Home चा ट्रेलर आला; पण..

एकदा मनात तुम्ही हे पक्क केलं की तुम्हाला सकाळी लवकर जाग आलीच म्हणून समजा.

झोपताना पाणी प्या: Drink plenty of water before the sleep

पाणी हे आपल्या शरीरास खूप महत्वाचं आहे. आणि इथेही आपल्याला पाणीच मदत करणार आहे.

आता तुम्ही विचार करत असाल की पाणी आपल्याला कसं काय सकाळी लवकर उठायला मदत करतं?

बिलकुलच नाही आपण झोपेत कुणाच्या अंगावर पाणी तर ओतणार नाहीच.

त्याचं असं आहे की झोपताना तुम्ही थोडंसं पाणी प्या कारण त्यामुळे तुम्हाला पहाटे लवकर लघवीला लागेल आणि तुम्ही आपसूकच जागे व्हाल.

पण पाणी पिताना एक बाब इथे लक्षात घेणे महत्वाचे आहे आणि ती म्हणजे तुम्हाला जास्त पाणी प्यायचे नाही.

झोपताना जास्त पाणी पिऊन झोपने म्हणजे सारखं लघवीला उठण्यास लागणे होय. त्यात जर आळस झाला तर त्याचा दुष्परिणाम मात्र किडण्यां वर होऊ शकतो.

त्यामुळे जास्त पाणी पिणे टाळा.

लवकर झोपा: Sleep early

आपल्याकडे एक म्हण प्रचलित आहे ती म्हणजे, लवकर निजे, लवकर उठे, आरोग्यसंपदा त्यास लाभे!

त्याच म्हणीप्रमाणे आपण रात्री उशिरापर्यंत न जागता लवकर झोपलं पाहिजे जेणेकरून आपली झोप पूर्ण होईल आणि आपल्यास लवकर उठण्यास मदत मिळेल.

लवकर झोपून साधारणपणे ६ तासांची झोप घेऊन त्या प्रमाणे लवकर उठण्याचा प्रयत्न केला काहीजे.

कमीतकमी सहा तास आणि जास्तीत जास्त आठ तासांची झोप ही घेतलीच पाहिजे.

बेडमधून बाहेर पडा: Get away from bed

सकाळी तुमचा अलार्म वाजला की पहिलं काम करा ते म्हणजे अलार्म बंद करून तसंच बेडवर पडून राहू नका.

अलार्म बंद केला की पटकन तुम्ही तुमचा बेड सोडा आणि बाहेर येऊन बाकी गोष्टी करण्यास सुरवात करा. जसे की तोंडावर पाणी मारणे, दात घासणे, पाणी पिणे इ.

बेडवर तसंच पडून राहिलं की आपण आपलं मन बदलू शकतो आणि नंतर झोपी जाऊ शकतो. तर पटकन बेड सोडल्यास आपल्याला हे टाळता येऊ शकतं.

चांगले विचार: Good thoughts

झोपताना जर तुम्ही चांगले विचार मनात घेऊन झोपत असाल तर नक्कीच तुम्हाला चांगली झोप लागेल आणि परिणामस्वरूप तुम्हाला जागही लवकर येईल.

त्यात तुम्ही चांगले विचार घेऊन झोपत असाल तर हमखास झोपेतून उठतानाही तुमचे विचार चांगलेच असतील आणि हि गोष्ट तुमच्या अख्ख्या दिवसाला चांगल्या प्रकारे प्रभावित करेल हे मात्र नक्की.

फक्त बाब झोपेची नाही साधारणपणे तुमचे विचार जर चांगले असतील तर बाकी लोकही तुमच्याकडे आकर्षित होतील.

वरील पाच गोष्टी काटेकोरपणे पाळा आणि पहा तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक सकाळ कशा प्रसन्न होतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *