तुम्हाला जर तुमचं इंग्लिश सुधरवायचं असेल तर इंग्लिशचा सराव- English Practice करणे खूप महत्वाचं असतं. English In Marathi
म्हणतात ना Practice makes man perfect- सरावाने माणूस परिपूर्ण होतो. English In Marathi
सध्याच्या स्पर्धेच्या युगात एखाद्याला इंग्लिश येणं खूप परिणामकारक आणि महत्वाचं होऊन बसलं आहे. भलेही आपली मातृभाषा मराठी असली तरी जागतिकीकरणाच्या स्पर्धेत आपल्याला इंग्लिशवर प्रभुत्व असायलाच हवं असं काही नसलं तरी आपल्याला गरजेपूरते इंग्लिश यायलाच हवं.
ऑफिसमध्ये चार-चौघात इंग्लिशमध्ये बोलताना कधी कधी तुम्हाला संकोचही वाटत असेल आणि तसं वाटणं साहजिकही आहे कारण इंग्लिश ही काही आपली मातृभाषा नाही.
पण सध्या सर्रासपणे सर्वत्र इंग्लिशचा वापर केला जातो. शाळा, कॉलेजेस, कार्यालये अशा ठिकाणी तिचा वापर केला जातो.
तर इंग्लिशचा मनात असलेला न्यूनगंड काढायचा असेल तर खाली पाच अशी मोबाईल अॅप्स- 5 Highly Recommended English Practice Apps दिली आहेत ज्यांचा वापर करून तुम्ही आपलं इंग्लिश कमालीचं सुधरवू शकता. English In Marathi

गुगल प्ले स्टोअर वर हे अॅप उपलब्ध असून ते एक प्रकारचं पेड अॅप आहे.
त्यावर आपल्याला शिकवण्यासाठी शिक्षक उपलब्ध असतात आणि पैसे देऊन आपण त्यांच्याकडून इंग्लिश शिकू शकतो.
IELTS चे पण कोर्स त्यावर उपलब्ध असून सर्टिफाइड ट्रेनर तुमच्या शिकवण्या घेतात.
मूलतः इंग्लिश बोलणारे वक्तेही तिथे उपलब्ध असतात.
English Conversation Practise:

इंग्लिशचा सराव करण्यासाठी हे ही जास्त रेटिंग असलेले अॅप आहे. गुगल प्ले स्टोअरवर त्याला 4.6 चं रेटिंग मिळालं असून ते 5 मिलियन पेक्षा जास्त वेळा डाउनलोड केलं गेलं आहे. तुमचं इंग्लिश सुधरवण्यासाठी तुम्ही या अॅपची मदत जरूर घेऊ शकता.
English Learning App: EngVarta:

हे एक उत्तम अॅप असून विशेष म्हणजे ते भारतीय बनावटीचं आहे.
camly प्रमाणेच तेही एक पेड अॅप असून त्यात त्यांनी वापरकर्त्यांना पेड प्लॅन्स पुरवले आहेत. भारतीय अॅप असल्यामुळे त्यात मूलतः इंग्लिश बोलणारे वक्ते उपलब्ध नाहीत पण; भारतातून इथे इंग्लिश शिक्षक उपलब्ध केले जातात.
फोन कॉल वरूनही तुमची शिकवणी घेण्याची सुविधा यांनी उपलब्ध करून दिली आहे.
Grammarly Keyboard – English Grammar Assistant:

ग्रामरली हे अजून एक लोकप्रिय अॅप आहे शिवाय त्याचं एक्सटेंशन जर तुम्ही लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर वर इंस्टॉल केलं असेल तर तुम्हाला त्याची कल्पना येईल.
आपण इंग्लिशमध्ये टाइप करतानाच्या झालेल्या चुका याद्वारे आपोआप दुरुस्त केल्या जातात किंवा त्याच्याकडून आपल्याला कळवल्या जातात.
त्यामुळे आपल्याला इंग्लिशमध्ये वाक्ये तयार करायला बरीच मदत मिळते. English In Marathi
Talk Now – Audio Chat to English speaking practice:

प्ले स्टोअरला हे अजून एक मस्त अॅप आहे ज्याला चांगलं रेटिंग प्राप्त आहे. कॉल आधारित हे अॅप असून तुमचं इंग्लिश चांगलं करण्यासाठी याचा वापर जरूर करू शकता.
हे वाचायला विसरू नका:
Spider-Man No Way Home चा ट्रेलर आला; पण..
आणि तो फोटो आजही जपानी लोक सामर्थ्याचं प्रतीक म्हणून वापरतात
येत आहे मराठी भाषेतलं हक्काचं ओटीटी (OTT)
शेवटी सराव महत्वाचा ठरतो. आपण कोणतेही अॅप आपल्या मोबाईलमध्ये घ्या आणि चांगला सराव करा. रोज काही ठराविक वेळ काढून त्यावरती मनापासून काम कर आणि पहा काही दिवसांतच तुम्हाला तुमच्यात सुधारणा झालेली पाहायला मिळेल.
नंतर तुम्ही आत्मविश्वासाने कुणाशीही इंग्लिशमध्ये न संकोचता बोलू शकाल! English In Marathi
छान माहिती..
धन्यवाद!