ashi hi banwa banwi
शेअर करा.

दिग्गज कलाकारांची फौज असलेला सिनेमा होता अशी ही बनवाबनवी.

मराठी चित्रपटसृष्टीतील एक मैलाचा दगड आहे अशी ही बनवाबनवी.

त्याकाळी चक्क जमवला होता ३ कोटींचा गल्ला:

२३ सप्टेंबर १९८८ साली पुण्यातील प्रभात नाट्यगृहात अशी ही बनवाबनवी Ashi hi banwa banwi हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला होता. ३ रुपये फर्स्ट क्लास आणि ५ रुपये बाल्कनी असे तिकीट असूनसुद्धा हाऊसफुल्लचे बोर्ड लागलेला आणि एवढ्या कमी तिकीट दरात त्यावेळी ३ कोटींचा व्यवसाय ashi hi banwa banwi total collection त्या चित्रपटाने केला होता.

ashi hi banwa banwi
ashi hi banwa banwi , image source: Twitter

८० च्या दशकात त्यावेळी एखाद्या मराठी चित्रपटाने कोटींचा गल्ला जमवणे ही त्यावेळी अशक्यप्राय अशी गोष्ट होती किंबहुना आजही आहेच असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही.

आजही या चित्रपटातील काही संवाद आणि त्यातील पात्रे मराठीच काय पण पूर्ण सिनेमा रसिकांच्या मनात अगदी घर करून आहेत.

अशी ही बनवाबनवीचे काही खास डायलॉग तुम्हाला माहीत आहेत का?

हा माझा बायको, तुमचे सत्तर रुपये वारले, धनंजय माने इथेच राहतात का? अरे परशुराम तू? आमच्या शेजारी राहते नवऱ्याने टाकलंय तिला, लिंबू कलरची साडी. Ashi hi banwa banwi dialogues

शीतल तारा या ट्वीटर वापरकर्तीने या चित्रपटातील डायलॉग चे खूप छान आर्टवर्क बनवले आहे.

अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर, सुशांत रे, अश्विनी भावे, सुप्रिया पिळगावकर, प्रिया बेर्डे आणि निवेदिता सराफ यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट आजही पाहताना कधी कंटाळा येत नाही. शिवाय सुधीर जोशी, विजू खोटे यांच्याही महत्वाच्या भूमिका होत्या. Ashi hi banwa banwi star cast

हे पण वाचा:

विद्यापीठात अहिल्यादेवींचा शस्त्रधारी अश्वारूढ पुतळाच व्हावा- पडळकर

शेतकऱ्याच्या बांधावरून जेव्हा महादेव जानकर थेट कृषि मंत्र्यांना फोन लावतात

टकाटक दिग्दर्शकाच्या नवीन चित्रपटाचे पोस्टर आहे ‘एक नंबर’

रितेश आणि जिनीलिया यांनी आणले शाकाहारी मटन

निर्माते किरण शांताराम, संगीतकार अरुण पौडवाल आणि सचिन पिळगावकर यांचे दिग्दर्शन लाभलेला हा सिनेमा होता.

चार सामान्य तरुणांची कथा असलेला हा चित्रपट म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीतील एक निखळ मनोरंजनाची मेजवानीच म्हणावा लागेल आणि त्यात भर म्हणजे त्या चित्रपटातील अजरामर असे डायलॉग.

शिवाय चित्रपटाचे संगीत आणि गाणीही उत्तम आहेत.

हे तुम्हाला माहीत आहे का?

या चित्रपटात अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे आणि खुद्द दिग्दर्शक सचीनजी यांनी दुहेरी भूमिका साकारल्या होत्या. त्यांनी पुरुषाची आणि स्त्रीची अशी दुहेरी पात्रे रंगवली होती. त्यांना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते.

या चित्रपटातील डायलॉग चे मिम्स खूप बनवले जातात. ashi hi banwa banwi memes

मागे एका मुलाखतीत अभिनेते आणि या चित्रपटाचे दिग्दर्शक सचीनजी म्हणाले होते की त्यांना तशी पटकथा मिळाली तर त्यांना या चित्रपटाचा रिमेक बनवायला नक्कीच आवडेल.

सध्याच्या घडीला असे निखळ मनोरंजन करणारे चित्रपट मराठीत बनणे दुरापास्त होऊन बसले असून या चित्रपटाचा रिमेक जेव्हा येईल तेव्हा येईल पान तोपर्यंत आपण या चित्रपटाची मजा कायम घेत राहुया.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *